ताज्या बातम्याबातमीराजकियराज्य

काय सांगताय! ‘या’ जिल्ह्यात तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही कोरोना बाधित

कोल्हापूर(ता.२६) : कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ आता एका खासदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा खासदार म्हणजे शिवसेना खासदार संजय मंडलिक हे आहेत.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अशातच या कोरोना संकटात मदतीला धावून आलेल्या लोकप्रतिनिधी वरतीही आता बऱ्यापैकी या संकटाने घाव घातलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

अशाच मदतीला धावून जात असताना, कोल्हापुरात तीन आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी होती. त्यात आजून एक भर म्हणून आता शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या संजय मंडलिक यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व त्यांची सध्या प्रकृती स्थिर असून, यांच्यासह आजून दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे व प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यतही कोरोना पोहचल्याने कोल्हापुरात चिंता वाढली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close