खेळ
टी ट्वेण्टी वर्ल्डकपसाठी ह्या १२ खेळाडूंची नावे तर कन्फर्म आहेत पण बाकी ३ साठी मोठी लाईन

आयपीएलचा रणसंग्राम संपल्यानंतर टी ट्वेण्टी वर्ल्डकपला मोठ्या दिमाखात सुरुवात होणार आहे. जलद क्रिकेट टी ट्वेण्टी मुले जास्त दिमाखदार झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्ल्डकप साठी प्रत्येक देश आपल्या खेळाडूंना तयार करत आहेत. भारतीय संघ सुद्धा नवीन युवा खेळाडूंना संधी देऊन टी ट्वेण्टी वर्ल्डकप साठी आपली तयारी करत आहेत.
टी ट्वेण्टी वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया मध्ये १८ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर ह्या वेळेत खेळवला जाणार आहे. भारतीय संघ ट्वेण्टी सामन्यात सर्वात मजबूत संघ मानला जातोय. एक प्रगल्भ दावेदार म्हणून संपूर्ण क्रिकेट चाहते भारतीय संघाकडे नजरा लाऊन बसले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अजुन कुणाची वर्णी लागेल म्हणून सर्वच ठिकाणी उत्सुकता आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा १२ खेळाडूंची नावे सांगणार आहोत ज्यांची नावे टी ट्वेण्टी संघात कन्फर्म आहेत. के एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शिखर धवन, मोहमद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, ऋषभ पंत.
राहिलेल्या तीन जागांसाठी जर महेंद्र सिंग धोनी ह्याचा नंबर लागू शकतो तर त्या पाठोपाठ शार्दुल ठाकूर, सुरेश रैना, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, मनीष पांडे, दीपक चहर, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल ह्यांचा नंबर लागतो.