ताज्या बातम्यादेशबातमीराजकियराज्य

‘या’ कारणासाठी कर्नाटक सरकार घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

कर्नाटक (ता.२६) :- कर्नाटकात अलमट्टी धरणाचा वाद सुरू असतानाच, मंगळवारी (ता.२५) कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येेडियुराप्पा यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी पंतप्रधानांना भेटू अशी घोषणा केली आहे.

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येेडियुराप्पा हे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते.त्यावेळी त्यांनी अलमट्टी जलाशयाचे पूजन केले. व त्यानंतर त्यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेईन असे सांगितले.

सोबतच ते एरव्ही सर्वसाधारण: पावसामुळे पूर येत नाही किंवा वित्तहानीही होत नाही. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास काहीच हरकत नसावी असे ही म्हणाले.
मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारला आंतरराज्य पाणीवाटप करारानुसार, धरणाची उंची वाढवण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांचीही संमती घेणे आवश्यक आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close