मनोरंजन
सुशांत सिंग राजपूतचा हा शेवटचा सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित

सुशांत सिंग राजपूतच्या अचानक एक्झिट मुळे सर्वानाच मोठा धक्का बसला आहे. प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतोय. का झालं? कसं झालं? ह्या मागे कोण आहे का नाही? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहेत. पण काहीही असले तरी एक शून्यातून मोठा झालेला कलाकार आपल्यात नाही राहिला ह्याची खंत नेहमीच आपल्याला भासत राहील.
पवित्र रिशता ह्या मलिकेपासून ते Chichore ह्या सिनेमा पर्यंत आपण त्याचा प्रवास पाहिला आहे. सर्वांच्या मते Chichore हा सिनेमा त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा सिनेमा आहे असे मानले जातेय पण असे नाहीये तर येणाऱ्या काही दिवसातच त्याची शेवटची फिल्म दिल बिचारा प्रदर्शित होणार आहे. द फॉल्ट इन आवर स्टार ह्या हॉलिवुड सिनेमाचा रिमेक हा चित्रपट असणार आहे.
कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा ह्या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहेत. ह्या सिनेमाचे शूटिंग खूप आधीच झालं होतं पण कोणत्याही डीस्ट्रीबुटर ने ही फिल्म स्वीकारली नाही म्हणून हा सिनेमा लांबणीवर गेला. ह्या सिनेमात सुशांत सोबत संजना मुख्य भूमिकेत आहेत. संजनाला तुम्ही रॉकस्टार सिनेमात नर्गिस फाकरी च्या बहिणीच्या भूमिकेत पाहिले आहे. दोन कॅन्सर ने ग्रस्त रुग्ण एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे कसे आयुष्य व्यतीत करतात, ह्यांच्या अवतीभवती फिरणारा हा सिनेमा आहे.
हा सिनेमा आता ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे लवकरच आपण सुशांतला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकतो.