बातमी

पाकिस्तान कधीच तुमचे उपकार विसरणार नाही फक्त एवढं काम करा आमच्यासाठी : शोएब अख्तर

संपूर्ण जगभर करोना व्हायरसने जणू थैमान घातले आहे. सध्या जगभरातील ७० टक्के लोक लॉक डाऊन आहेत. अनेक लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. भारतात सध्या रोज करोना रुग्ण वाढत आहेत. पाकिस्तान देशात सुद्धा अनेक रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची अर्थव्यवस्था सुद्धा कोलमडून पडली आहे. अशातच एक मदतीचा हात म्हणून आज पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तर ह्यांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे.

जर भारत आम्हाला करोना विरुद्धच्या लढाईसाठी १० हजार व्हेंटिलेटर देऊ शकेल तर आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. असे शोएब अख्तर ह्यांनी म्हटलं आहे. जर असे केले तर पुढे जाऊन भारत आणि पाकिस्तान संघात आपण तीन प्रेक्षणीय सामने सुद्धा खेलवू शकतो. नेहमीच भारत पाक सामने बघणाऱ्याची गर्दी जास्त असते. जर आपण असे सामने खेळविले तर मिळालेल्या पैशातून आपण करोना रुग्णाच्या कुटुंबीयांना मदत करू शकतो. हे सर्व संकट टळलं की आपण हे सामने खेळवू शकतो. मी माझ्यापरीने एक प्रस्ताव मांडत आहे. ते पूर्ण करायचा की नाही हे संपूर्णपणे भारत सरकारच्या हातात आहे.

शोएब अख्तर नेहमीच आपल्या यूट्यूब चॅनेलवरून भारत आणि पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी बोलत असतो. त्याने केलेल्या ह्या मागणीचे भारत सरकार किती गांभीऱ्याने विचार करेल ही तर वेळच ठरवेल. पण तुम्हाला काय वाटतं मित्रानो ह्या बद्दल? भारत सरकारने मदत करावी की नाही? तुमचे मत आम्हाला नक्की कळवा.

Tags

Related Articles

3 Comments

  1. पाकिस्तान म्हणजे साप आहे…कितीही दूध पाजलं तरी ते चावणारच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close