बातमी

इंस्टाग्राम वरील एक पोस्ट करण्यासाठी शहनाज गील घेते एवढे लाख रुपये

बिग बॉस मुळे चर्चेत आलेली शहनाज गिल अजूनही लोकांच्या हृदयावर राज्य करतेय. सिद्धार्थ शुक्ला असीम रियाज सोबत शहनाज सुद्धा तेवढीच मातब्बर खेळाडू बिग बॉस पर्व १३ मध्ये मानली जात होती. पण शेवटी सिद्धार्थ ने हे पर्व जिंकून ट्रॉफी आपल्या नावावर केली. जरी शहनाज पराभूत झाली तरी तिची चर्चा मात्र संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये सुरू झालीच होती.

ह्याचाच फायदा तिला घरा बाहेर पडल्यानंतर मिळाला. लगेचच तिला मुझसे शादी करोगी हा रिऍलिटी शो मिळाला. आणि त्यानंतर एक दोन अल्बम मध्ये सुद्धा तिला काम करण्याची संधी मिळाली. ह्याच प्रवासात अनेकांनी तिला डोक्यावर उचलून धरलं होतं. बिग बॉस अगोदर सुद्धा ती पंजाबी गायिका म्हणून प्रसिध्द होती पण बिग बॉस नंतर मात्र तिच्या चाहता वर्गात अजून भर पडली.

ती ऑनलाईन सक्रिय आहे. नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर तिचे सध्या ४९ लाख सभासद जोडले गेले आहेत. तिने एखादी पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टला ७ ते ९ लाख दरम्यान लाईक्स तर १० ते १२ लाख दरम्यान व्ह्यू सुद्धा मिळतात. ह्याच गोष्टीचा फायदा तिला होतो कारण जेव्हा ती कोणत्याही ब्रँडची जाहिरात करते तेव्हा एक विशिष्ट किंमत त्यांच्याकडून आकारते.

आता तुम्ही म्हणाल ही किंमत किती आहे? तर ही किंमत एखाद्या बॉलीवुड स्टार सारखी मोठी आहे. कारण शहनाज एक पोस्ट करण्यासाठी ब्रँड कडून ८ लाख रुपये घेते. पण हीच किंमत लॉक डाऊन मध्ये वाढून आता १० लाख झाली आहे. त्यामुळे शहनाजला एक पोस्ट करण्यासाठी भलीमोठी रक्कम प्राप्त होते.

शहनाजच नव्हे तर भारतातील अनेक सेलेब्रिटी ब्रँड कडून पोस्ट करण्यासाठी भली मोठी रक्कम आकारतात. भारतात विराट कोहली सर्वाधिक रक्कम एका पोस्ट साठी आकारतो. विराट एका पोस्ट साठी ८० लाख ते १ करोड एवढी रक्कम आकारतो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close