खेळ
पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीला करोनाची लागण

सध्या करोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याच बरोबर काही दिवसापासून अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे निकष समोर आले आहेत. अशीच एक बातमी आताच पाकिस्तान मधून आली आहे. अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ह्याला कोरोनाची लागण झाली आहे.
आजच म्हणजेच शनिवारी त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ह्याची माहिती आपल्याला चाहत्यांना दिली. त्याने ट्विटमध्ये असे लिहिले होते “मी गुरुवार पासून खूप अस्वस्थ फिल करत होतो, मासे संपूर्ण अंग दुखू लागले होते, टेस्ट केल्यानंतर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि मला ह्या महामारी ने ग्रासले, लवकर बरे होण्यासाठी मला तुमच्या शुभेच्छाची गरज आहे “

अनेक खेळाडूंनी त्याला लवकर बरा होऊन घरी परतशील अशा शुभेच्छा दिल्या आहेत. जगात को चा वाढता प्रभाव पाहता सध्या कुणीच पूर्णपणे सुरक्षित नाहीये. त्यामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. नेहमीच बाहेर पडताना मास्क लावा, वेळ मिळेल तेव्हा हात धुवत रहा, जास्त लोकांच्या संपर्कात येऊ नका. तरच तुम्ही ह्या महामारीपासून वाचू शकता.