मनोरंजन
अभिनेता सौरभ गोखलची पत्नी आहे उत्कृष्ठ अभिनेत्री, केलेय अनेक हिंदी सिनेमात काम

अनेक मराठी मालिकांमध्ये उत्तम अभिनय करणारा तसेच मराठी चित्रपट मध्ये काम करणारा शिवाय नव्याने होऊन गेलेला सिंबा या बॉलीवूड चित्रपट मध्येही सौरभ ने काम केले आहे. या अभिनेत्याची सर्वात जास्त लोकांना आवडणारी मालिका म्हणजे राधा ही बावरी होय. या मालिकेने या अभिनेत्याची ओळख आपल्याला करून दिली.
परंतु लाईन व्यस्त आहे, योध्दा, तलाव आणि भोभो हे मराठी चित्रपट तर सिम्बा ह्या हिंदी चित्रपट मध्ये त्याने काम केले आहे.
अभिनय करणे ही त्याची लहान असल्यापासूनची आवड होती. त्यामुळे शाळेत असल्यापासून नाटकामध्ये काम करणे आलेच त्याचबरोबर त्याने आपले शिक्षण ही मन लाऊन पूर्ण केले. सौरभचे आई वडील हे दोघेही मुळात डॉक्टरी पेशा असणारे, त्यामुळे अभ्यास करणे हे त्याच्या रक्तातच होते. त्याची पहिली मालिका २०१० मध्ये आली होती. तीच नाव मांडला दोन घडीचा डाव तिथून त्याचा प्रवास सुरू झाला.
सौरभची बायको अनुजा साठे ही देखील याच फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. ती सुधा दिसायला तितकीच सुंदर आहे. तिनेही मालिका आणि चित्रपट या दोन्ही ठिकाणी काम केले आहे. हिंदी मालिकेमध्ये ही तिने काम केले आहे. पेशवा बाजीराव मस्तानी ही तिची पहिली मालिका त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम मिळत गेले. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे तिचा अभिनय पाहून तुम्हाला नक्की वाटेल.

अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपट मध्ये ही आपल्याला पाहायला मिळाला ‘परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपट मध्ये ही ती जॉन अब्राहम सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या एम एक्स प्लेअर वरील एक थी बेगम सिनेमातील तिचे काम लोकांना खूप जास्त आवडत आहे.