मनोरंजन

रेखाची अपूर्ण राहिलेली प्रेमकथा

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी रेखा आजही तेवढीच सुंदर दिसते. आपल्या तारुण्यात तिने अनेक सिनेमे केले. ह्यावेळी तिचे नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडले गेले. कधी तिचे नाव अमिताभ बच्चन ह्यांच्या सोबत जोडलं गेलं तर कधी आपल्या वयापेक्षा कमी वय असलेल्या अक्षय कुमार सोबत सुद्धा नाव जोडलं गेलं. अभिनेता विनोद मेहरा सुद्धा ह्याच सूची मध्ये मोडतात. त्यांच्यासोबत पण रेखाचे नाव बऱ्याचदा जोडले गेले. तिच्या प्रेम करणारे तर खूप होते पण तिचा जीव कुणात दडला होता? ह्याच उत्तर आजही लोकांना मिळाले नाहीये.

आज आम्ही तुम्हाला रेखा बद्दल अशी गोष्ट सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहिती असेल. विनोद मेहरा ह्यांच्यासोबत रेखाने कोलकात्यात गपचूप लग्न केलं होतं. १९७३ मध्ये ह्या त्यांच्या लग्नाच्या चर्चेला खूप उधाण आलं होतं. पण असेही सांगण्यात येतं की ह्या दोघांचा संसार फक्त दोन महिने चालला. विनोद ह्यांची आई ह्या लग्नाच्या विरोधात होती. उडती अशीही गोष्ट कानी पडली होती की आई किंवा पत्नी ह्या दोघांमधून विनोद ह्यांनी आईची निवड केली होती.

सांगणारे असेही सांगतात की रेखाला विनोद मेहरा सोबत संसार करायचा होता. पण जास्त घरगुती कारणांमुळे गोष्टी पुढे जाऊ शकल्या नाहीत. विनोद ह्यांच्या आयुष्यातून जाण्याने रेखा पार खचून गेली होती. स्वतःला संपवून टाकू, असे त्यांच्या मनात अनेकदा चाललं होतं. बऱ्याचदा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला होता. पण काही महिन्यांनी स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं.

आजही रेखा एकट्याने आयुष्य जगत आहे. तिने लग्न केलं नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close