कथा

ऑनलाईन प्रेम

जय काय करतो आहेस? जेवलास का? सुधाने इंस्टावर मेसेज केला. जय आणि सुधा दोघांची ओळख सात महिन्यापूर्वी झाली होती. जय ने सुधाला फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. सुधाचा डिपी त्याला खूप जास्त आवडला होता. त्यामुळे पाहताक्षणी त्याने तिला रिक्वेस्ट पाठवली. आधी सुधा ने एक दोन वेळा ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही. पण तिने अनेकवेळा रिजेक्ट करूनही तो रिक्वेस्ट पाठवत राहिला. म्हणून तिनेही रिक्वेस्ट स्वीकारली.

काय मिस्टर तुमची रिक्वेस्ट स्वीकारत नाही तरी तुम्ही सारखे का पाठवत आहात? सुधा ने लटक्या रागातच विचारले. जय ने ही त्याच जोशात उत्तर दिले. काय आहे ना जी तुमच्या सारखी सुंदर मुलगी आजवर कधी पाहिली नाही आणि असे कुणी नजरेला भिडले नाही. पण जेव्हा तुमचा फोटो पाहिला तेव्हा मात्र काळजात गिटार वाजायला लागले. पहिल्या नजरेचे प्रेम वैगेरे म्हणतात ना तसे काही झालेय मला.

ओ हॅलो मिस्टर मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही तुमच्याबद्दल मला काहीही माहीत नाही. मग हे असे प्रेम वैगेरे तर खूप लांब आहे आणि मला तर हे प्रेम लग्न ह्यात काडीमात्र विश्वास नाहीये. अहो सुधा जी तुम्ही नका करू की प्रेम पण मी मात्र ह्या चेहऱ्यावर ह्या व्यक्तीवर अतोनात प्रेम करणार आहे. अगदी माझी लाईफ असेपर्यंत. त्याचे हे बेधडक बोलणे खरतर सुधाला आवडलं होतं. पण तिने दाखवून न देता फक्त मैत्री स्वीकारली. असेच पाच महिने कधी उलटुन गेले दोघानाही कळलं होत. दोघात प्रेम तर झाले होते पण भावना व्यक्त झाल्या नव्हत्या.

सकाळी उठल्यानंतर चाट करणे, दिवसभरातून तीन चार तास फोनवर बोलणे, मग रात्री परत एक दोन वाजेपर्यंत चाट करणे चालूच होते. एकदिवस बोलणे नाही झाले तर दोघांनाही करमत नव्हते. एक दिवस जयने पुढाकार घेऊन मेसेज केला. मला माहित आहे तुझा प्रेमावर लग्नावर विश्वास नाहीये पण विश्वास ठेव माझ्यावर एकदा तू माझी झालीस तर तुझे संपूर्ण आयुष्य मी काळजी घेईल. कधीच तुला एकटे सोडणार नाही. माझ्या घरच्या विरुध्द जायची वेळ आली तरी मी तुला निवडेल. पण मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, सुधा लग्न करशील माझ्याशी?

प्रेम आणि लग्न ह्यापासून लांब पळणारी सुधा ह्या जयच्या प्रपोजने पार कोमेजून गेली होती. पण तिच्या आयुष्यात जो भूतकाळ घडला होता तो जयला माहीत नव्हता. तिने जयला मेसेज केला. तुझ्याबद्दल मलाही भावना आहेत. माझेही तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. पण नात्याची सुरुवात करताना मला तुला काहीतरी सांगायचे आहे. तुला ऐकुन धक्का बसेल पण ते ऐकल्यावर मग तुझा निर्णय मला कळव.

माझे अगोदर लग्न झाले होते. घरच्यांनी माझ्यासाठी शहरतातला मुलगा पाहिला होता. गडगंज संपती, खूप मोठं कुटुंब अगदी एखाद्या मुलीला शोभेल असे सासर मला मिळाले होते. पण म्हणतात ना जसे दिसते तसे कधीच नसते. आधीचे काही दिवस छान गेले. आम्ही हनिमूनसाठी बाहेर गेलो होतो. पण त्याने तेव्हा माझ्या अंगाला ही स्पर्श केला नव्हता. मला वाटले आमचे नवीन लग्न आहे, कदाचित तो ही लाजत असेल म्हणून आम्ही फक्त फिरून घरी आलो. लग्नाला दीड महिना सरला तरी त्याने माझ्या अंगाला हाथ लावला नव्हता. आता मात्र मला संशय येऊ लागला होता.

त्याने कधीच मला बायको म्हणून स्वीकारलेच नव्हते. मी अनेकवेळा प्रयत्न केला पण त्याच्या बाजूने नेहमीच नकार असायचा. मी एकदिवस त्याला समोर बसवले, विचारले का तुम्हीं असे करत आहात? माझ्यात काही कमी आहे का? मी चांगली दिसत नाहीये का? की तुमचे बाहेर कुठे प्रेम प्रकरण आहे? मला वाटले होते तो माझ्यावर रागवेल चिडेल, पण झाले वेगळेच. तो रडू लागला माझ्या पाया पडू लागला. आधी मला काहीच सुचले नाही पण नंतर त्याने जे सांगितले ते ऐकुन माझ्याही पायाखालची जमीन सरकली.

तो गे होता. त्याला मुलींमध्ये काडीमात्र इंटरेस्ट नव्हता. त्याच्या घरातील तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या आई वडिलांनी लग्नासाठी त्याच्यावर जबरदस्ती केली होती. पण ह्या सर्वात मी मात्र मधेच अडकली. त्याने माझी माफी मागितली आणि मला घरी आणून सोडले. आमचा दोन महिन्याचा संसार झाला आणि मग आम्ही घटस्फोट घेतला.

आता मला जय तू सांग तू करशील का अशा मुलीशी लग्न? जिचे आधीच एक लग्न झाले आहे? आमच्यात काहीही झाले नसले तरी समाजाला हेच वाटणार की दोन महिने राहिले त्याच्याकडे मग काहीतरी झालेच असेल. ह्याच कारणामुळे अनेक मुलांनी मला परत रीजेक्ट केलं आहे. त्यानंतर आयुष्यात तू आलास. तुझा खोडकर मनमिळावू स्वभाव नेहमीच मला आनंदी ठेऊ लागला. त्यामुळे मी ही तुझ्या प्रेमात कधी पडले ह्याचे मलाच भान राहिले नाही. फक्त आता उत्तर तुला द्यायचे आहे. हे सर्व ऐकुन तुझा काय निर्णय आहे तो मला सांग.

हे सर्व ऐकल्यापासून जय ने सूधाला सर्व ठिकाणी ब्लॉक केली आहे. तिने अनेकवेळा दुसऱ्या नंबर वरून कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण सूधाचा आवाज ऐकल्यावर तो फोन कट करत आहे. आयुष्यात परत एकदा प्रेम करून सुधा ने चुकी केली? की तिचा घडलेला भूतकाळ सांगून तिने चुकी केली?

मित्रानो तुम्हाला काय वाटते जयचे हे वागणं योग्य आहे का? परत जय तिच्या आयुष्यात येईल की नाही? सुधा ने आता पुढे काय करावे? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. आपल्याच वाचकातील एका मुलीची आहे. कदाचित तुमचे कमेंट वाचून तिला पुढे काय करावे ज्याची जाणीव होईल.

Tags

Related Articles

22 Comments

 1. सुधा ला जय चा विचार पूर्णपणे डोक्यातून काढायला हवा कारण तो फक्त तिच्या दिसण्यावर प्रेम करत होता…. आणि हे फक्त आकर्षण असतं, त्याचं जर तिच्यावर प्रेम असतं तर त्याने तिला कधीचं block केल नसतं तिच्या पाठीशी खम्बिर पणे उभा राहिला असता कारण जी ताकद प्रेमात आहे ती दुसऱ्या कशातच नाही…… सुधाने तिच्या भवितव्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं…..

 2. Sirsalaamt pagadi Pahas to ekta murkh nighala mhnun sagalya mulana tyachya barobar tulna karane yogy nhi
  Pryant karane anandi rahane , positive vichar karat rahane

 3. एखाद्याच्या आयुष्यात असे काही झाल्यानंतर पुन्हा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप अवघड असतं. अचानक पुन्हा कोणी आयुष्यात येत अणि पुन्हा तीच व्यक्ती विश्‍वास मोडून जाते.. त्यावेळेस ती व्यक्ति जे काही सहन करते, ते शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. कारण एकदा पाडल्यानंतर स्वतः ला सावरणे एवढे अवघड जात नाही, पन पुन्हा पडल्यानंतर मग मात्र सावरणे खूप अवघड असतं.. कारण कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायला हे मन तयार होत नाही. प्रेमा सारखी सुंदर भावना या जगात दुसरी कोणतीही नाही.. आणि प्रेम हे प्रेमाने मिळवता येत, जोर जबरदस्तीने नाही. एखाद्याच रूप पाहून प्रेम नाही होत, ते फक्त क्षणिक आकर्षण असते.. खऱ्या प्रेमात समजायच्या असतात त्या एकमेकांच्या भावना. बस एवढे सांगेल, तुला तुझ प्रेम नक्की मिळेल, थोडा धीर धर. हार मानू नकोस. हे ही माहीती आहे, की सांगणे सोप आहे, पन करणे खूप अवघड आहे. पन विश्वास ठेव सर्वच व्यक्ती सारख्या नसतात.. या आधीच्या व्यक्ति तुझ्याशी अशा वागल्या त्यामुळे पुढे मिळणार्‍या व्यक्ति पुन्हा असेच वागतील असे होणार नाही.. जे काही होत ते चांगल्या साठीच होत असे समजून पुढे वाटचाल कर. अणि नेहमी खुश रहा.. कारण हे आयुष्य खूप सुंदर आहे.. अगदी तुमच्या सारख…

 4. मला वाटत की जय च सुधा वर खरं प्रेम नव्हतं तो फक्त तिचे रूप पाहून प्रेम करत होता माझ्या मते सुधा ने जय चा विचार सोडून द्यावं

 5. No definitely not she should move forward in her life …Jay actually doesn’t deserve her…she will find someone better never lose hope…

 6. इथे एक गोष्ट जाणवली कि त्याच तिच्यावर प्रेम नव्हतंच त्याच फक्त शारीरिक आकर्षण होत आणि त्याला तीच शरीर पाहिजे होत जर त्याच खरं प्रेम असत तर त्याने तिचा भूतकाळ स्वीकारून तिच्यासोबत लग्न केल असत आणि तिचा आयुष्यभराचा साठी बनला असता पण याउलट झालं आणि तीला तिची चूक कळली आणि ती सुद्धा वेळेच्या आत नाहीतर ती परत उध्वस्त झाली असती….

 7. खर म्हणजे सुधाच कौतुक करावे ते कमी आहे तिच्या हिम्मतीची दाद द्यावी वाटते करण इतक्या खरेपणा कुणी बोलत नाही व सांगत देखील नाही पण इतका खर सांगितल्यावर जय ने सुधा कडे परत जावं लग्न म्हणजे फक्त सेक्स नाही आहे ते आहे समजूतदारपणा, विश्वास जो सुधाने जय वर दाखवून आपला भूतकाळ सांगितलं आणि लग्न झालेल्या मुली सोबत विवाह करणे काही वेगळं नाही आहे मी तर बोलेन की करावं जय ने सुधा सोबत लग्न. मला आवडेल इतका खरेपणा असलेले मुलगी , लग्न झाल्यानंतर पुरुष बाहेर लग्न झालेल्या बाई सोबत अफेअयर ठेवतात ना ? मग जर इतकी छान मुलगी जे सर्व खर बोलत असेल तर काय हरकत आहे हा सर्व सो कॉल्ड पुरुष प्रधान संस्कृतीचा भाग म्हणून पुढे नेतोय बाकी काही नाही तिच्या कडे लपविन्यसारखं नाही म्हणून तिचा तिरस्कार करणे योग्य नाही असे किती पुरुष इतका खर बोलू शकतील

 8. Jay is caword, if he really loves her he should accept her with her flows not to culminate her, even she made it clear that she will have friendship only with him initially, later on when he proposed she genuinely stated about her past which is admirable she asks her if he is ready to marry and accept her with her bitter past, but past is past a person may have a nasty past this doesn’t means they don’t have desires dreams to have a happy life it’s every individual right, even if he would have accepted her he would have gained love and such respect from the girl he had imagined to marry.

 9. तो तिचा फक्त वापर करणार होता जर त्याचे प्रेम खरे असले तर तो लगेच हो म्हणाला असता. बर झाल तिने सांगितले नाहीतर नंतर काय अवघड झाले असते सुधा ने सांगितले बरे केले त्याची असलियात कळाली

 10. आजच्या काळात स्त्रीला भोगवस्तू म्हणून पाहतात मग ते मुलगी असो किंवा महिला प्रत्येकाने महिलांना चांगल्या विचाराने बघितले पाहिजे. ती पण कोणाची बहीण आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, यामध्ये जय या नावाच्या मुलांची गलती आहे त्याने फक्त तिला भोगवस्तू म्हणून बघितले आहे हा त्यांचा गुन्हा आहे. जय चं तिच्यावर खरंच प्रेम असत तर तो तिला आधार दिला असता. आजच्या काळात कोणत्याही स्त्री किंवा मुलीला नकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मी सुधाचं समर्थन करतो की तिने खरं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या नालायक जय ला कसं कळणार की प्रेम काय असत ते. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सगळेच मुली आणि मुलं खराब नसतात. काही हळव्या मनाचे पण असतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी संधी मिळाली पाहिजे मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो.

  सुधा ला मला एकच सांगायचं आहे की धीर नको सोडू जिवनात असे अनेक चढ-उतार होत असतात सगळेच दिवस सारखे नसतात, एक दिवस असा येईल की तुझ्या भावना समजून घेणारा तुला भेटणारच. तो तुझ्या सौंदर्यावर प्रेम करणारा नसेल तर तो तुझ्या भावनेवर तुझ्या मनावर प्रेम करणारा मुलगा असे?? धन्यवाद. जर माझ्या शब्दातून कोणाला राग आला असेल तर एक मित्र किंवा लहान भाऊ समजून मला माफ करावे.

 11. खरं तर जय चं सुधावर प्रेमच नाही आहे कारण तो फक्त तिचा वापर करण्याच्या दृष्टीने बघत होता. जय चं सुधावर प्रेम असत तर तो तिला सोडून गेला नसता प्रत्येकाला भावना आहे कोणीही कोणाच्या भावनांशी खेळु नये. मग तो मुलगा असो किंवा मुलगी सगळ्यांना आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल, ती पण एक स्त्री आहे कोणाची बहीण आहे कोणाची मुलगी आहे पत्नी आहे. तिला भोगवस्तू म्हणून बघणे सोडून द्यावे.
  कारण सर्व मुलं आणि मुली सारखे नसतात.

  माझं सुधाला एकच सांगायचं सांगणं आहे की हार मानू नकोस धीर सोडू नकोस. सगळे दिवस सारखे नसतात. एक दिवस असा येईल की तुझ्या भावनेवर तुझ्या मनावर प्रेम करणारा मुलगा तुला भेटेल.

 12. Khoop waeet jhal tichyasobat….. wachun khoop dukh jhal…. pn 1 goshti mule life cha vichar karawa….. aani tya muli chi kahi chuki nahi tyat….. tichya aai aani baba ni tya mulachi chokashi karayala pahije hoti…..pn paisa chya pudhyat tyana kahi disale nasel….. pn tya muli ne aata strong jhali pahije…. jhal te chukich pn aata strong rahayach….. comment wachat asal tr aamhi tumachya pathishi aahe…… kalaji ghya…..

 13. याचे खर उत्तर फक्त जयच देऊ शकतो. तुम्ही आम्ही फक्त तर्क वितर्क लावू शकतो.

 14. Hiee… sudha kharch tya jaych kharch tujhyavr khar prem navt.. aani jr khar ast tr tyane tri hi tujhi choice keli asti.. bcz prema sathi kontya hi maryada nastat.. mhnun jr as kahi new person ala life mdhe aani asa kahi ghadel asa vattat asel tr tyala pahila sarv sang.. mhnje hi situation part nahi yenar.. tc dear sab thik hoga😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close