मनोरंजन

मराठी बिग बॉस सिझन ३ मध्ये हे स्पर्धक दिसू शकतात

हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिझनने ह्या वर्षी टीआरपीचे एक वेगळे उच्चांक गाठले होते. सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज आणि शेहनाज गिल ह्या तीन स्पर्धकांमधून विजेता कोण होणार ह्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सिद्धार्थ शुक्ला ह्या पर्वाचा विजेता ठरला. ह्याच हिंदी बिग बॉसचे भूत आपल्या अंगावरून उतरते ना उतरते तेव्हाच मराठी बिग बॉस सिझन तीनची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे. त्यामुळे नक्कीच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.

दोन पर्वा प्रमाणे ह्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन सुद्धा महेश मांजरेकर करणार आहेत. पहिल्या पर्वाच्या यशानंतर मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व किती यश मिळवणार ह्यात शंका होती. पण पहिल्या पर्वाचे सर्व विक्रम मोडीत काढत दुसऱ्या पर्वाने अपेक्षेपेक्षा खूप जास्त यश संपादित केले. रात्री मालिका पाहणारी लोक बिग बॉस पाहू लागली. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या पर्वाकडून खूप जास्त इच्छा अपेक्षा लागून राहिल्या आहेत. दुसऱ्या पर्वात विना जगताप, नेहा शितोळे, शिव ठाकरे, अभिजित बीचुकले, शिवानी सुर्वे ह्यांनी आपली एक वेगळी ओळख घराघरात निर्माण केली.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद शिव ठाकरे ह्याने आपल्या नावावर केले होते. आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने त्याने सर्वानाच आपलेसे करून घेतले होते. त्यामुळे यावर्षी नवीन प्रेक्षकांना काय पहायला मिळणार म्हणून सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे.

बिग बॉसमध्ये स्पर्धक कोण असणार ह्याबाबत नेहमीच उत्कंठा वाढलेली असते. ह्या स्पर्धकांची नावे सहजसहजी बाहेर येत नाहीत. पण आज आम्ही तुम्हाला अशा संभाव्य स्पर्धकांची नावे सांगणार आहोत जे कदाचित तुम्हाला ह्यावेळी बिग बॉस सिझन ३ मध्ये पाहायला मिळतील.

संभाव्य स्पर्धक
समीर चौघुले, रुपाली नंद, आनंद इंगळे, अंशुमन विचारे, नेहा जोशी, ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, प्रणित हाते (गंगा), शिवानी दांडेकर, आनंद काळे, कमलाकर सातपुते, चिन्मय उदगीरकर, नक्षत्रा मेढेकर, निशिगंधा वाड, सायली रानडे, पल्लवी सुभाष, शुभंकर तावडे, केतकी चितळे, नम्रता संभेराव.

कलर्स वाहिनीवरील बिग बॉसच्या ह्या तिसऱ्या पर्वाला १२ एप्रिल २०२० पासून सुरुवात होणार आहे. वर दिलेल्या संभाव्य यादीमधील तुम्हाला कोणता स्पर्धक बिग बॉस मराठी मध्ये पाहायला जास्त आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा.

Tags

Related Articles

4 Comments

  1. खेळाडू, नवे लेखक,नवेउद्योजक,कवी ग्रामीण भागात काम करणारे डाॅक्टर. सामाजिक कार्यकर्ते आणा. भांडकुदळ tv star बासझाले.उगीच जाग्रणाचा त्रास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close