मनोरंजन
महेश मांजरेकर यांच्यात झालाय कमालीचा बदल बघा आता कसे दिसत आहेत

उत्तम अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा अनेक टप्प्यांमध्ये आपल्याला महेश मांजरेकर यांनी भरभरून चित्रपट दिले आणि ते लोकांना खूप आवडलेही. त्यांचे वय आता जवळ जवळ 61 वर्ष आहे. पण त्याच्यात झालेला बदल पाहिल्यावर तुम्हाला त्यांच्या वयाचा ही विसर पडेल आताच होऊन गेलेल्या चला हवा येऊ द्या या शो च्या एका एपिसोड मध्ये त्यांचा नवीन बदलाव पाहायला मिळाला होता. त्यांचा नवीन लूक मध्ये त्यांनी स्वतःमध्ये खूप बदल केला आहे.
पहिले पाहिलेले महेश मांजरेकर आणि आता पाहिले तर त्यांच्यात दिसणारा बदल तुम्हाला ही आश्चर्य चकित करून सोडेल. खर तर आता ते पहिल्या पेक्षा अधिक तरुण आणि हँडसम दिसत आहेत. त्यांचा नवीन फोटो ही त्यांनी इंस्टाग्राम वर टाकला आहे. त्याच्यासोबत जुना फोटो ही शेअर केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला इच्छा असेल तर त्या वेळी मार्ग हा नक्कीच असतो. त्यांनी त्यांच्या फोटो मधील जो फरक आपल्यासमोर ठेवत आपल्याला ही नवीन काहीतरी करण्याची उमेद जागृत केली आहे.
महेश मांजरेकर यांनी आपले वजन कमी करण्यासाठी डाएट वर जास्त भर दिला आहे आणि जवळ जवळ 8 महिन्यांमध्ये हा त्यांचा जबरदस्त लूक आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यांच्या या लूक वर अनेकांनी इंस्टाग्रामवर त्यांना चांगल्या कमेंट ही केल्या आहेत.

सध्या सगळ्या कलाकारांप्रमाणे ते ही घरी बसून आपले काम करत आहेत. त्यांनी चित्रपटाच लिखाण करायचे काम हातात घेतले आहे. तसेच एक नवीन चेहरा शोधण्यासाठी ऑनलाईन ऑडिशन घेण्यात येत आहे. यामध्ये जे लोक या क्षेत्रात यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर ही सांगीतली आहे.