मनोरंजन

क्रांती रेडकर ही मराठी अभिनेत्री, पहा तिच्या दोन जुळीच्या मुलींची काळजी कशी घेते

क्रांती रेडकर या अभिनेत्रीला तुम्ही सर्व ओळखून असालच कोंबडी पळाली या गाण्याने ही अभिनेत्री त्या वेळी खूप प्रसिध्द झाली होती. त्यानंतर ती आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. ऑन ड्युटी 24 तास’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’आणि तितकीच ती आपल्याला आवडत ही गेली. पण या अभिनेत्रींच्या घरातील वातावरण कसे आहे ती आपल्या आयुष्यात कसे जगत आहे ह तुम्हाला माहीत आहे का?

क्रांती रेडकर या अभिनेत्रीने मार्च २०१७ रोजी आपले लग्न उरकून घेतले होते. ते ही आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत यांच्यासोबत. दोघांची मने एकमेकांच्या खूप भिन्न आहेत. तरीही दोघांनी एकमेकांना समजून घेण्यात आणि मनातील विचारांची देवाण घेवाण करून त्यावर तोडगा काढणे या सगळ्या गोष्टी संसारात आल्याचं जशा तुमच्या आमच्या ही येतात यातूनच तर संसार खुलत जातो.

सध्या क्रांती ही जास्त प्रकाशझोतात आली आहे ती म्हणजे आपल्या दोन जुळ्या मुली यांच्या मुळे, तिला दोन जुळ्या मुली आहेत. त्यांचा जन्म ३ डिसेंबरला झाला आहे. ह्या जरी सेलिब्रिटीच्या मुली असल्या तरी तुमच्या आमच्या मुलांसारखे त्या ही रोजच्या आयुष्यात दंगा मस्ती करत असतात. तिच्या मदतीला एक मदतनीस असली तरी आईची कामे सांभाळून मुलांकडे लक्ष देणे ही गोष्ट क्रांतीने चांगल्या रीतीने हाताळली आहे. तसा व्हिडिओ ही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे, सगळ्याच आया अशाच असतात, पण प्रत्येक आईची कामे आणि मुलांची स्वभाव यात खूप फरक असतो. ती स्वतः एक सेलिब्रिटी आहे शिवाय तिचा बिझिनेस ही आहे. शिवाय दिग्दर्शनचे काम ही तिने जबाबदारीने पेलले आहे. शिवाय जुळ्या मुलांना सांभाळणे सध्याच्या काळात कठीण काम आहे. तिच्या मुली खूप गोड आहेत तिच्यासारख्या ती सांगते की रात्री मुलींना ती स्वतः झोपवते त्यांना अंगाई गाते.

Source Kranti Redkar Social Handle

आपल्यासाठी काही शॉपिंग करण्यासाठी गेले असता ती विसरून पहिली शॉपिंग मुलींसाठी असते. ती आपल्या मुलींना चांगल्या प्रकारे सांभाळते याचे सर्व श्रेय ती तिच्या फॅमिलीला देते. तिचा नवरा आणि घरातील मंडळी यांची साथ तिला नेहमीच मिळाली आहे. तिचे सासर आणि माहेर हे जवळच असल्यामुळे त्यांची साथ तिला खूप जास्त मिळाली आहे. सध्या तरी तिने आपल्या या दोन्ही मुलींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत बघुया वाट बघूया कधी करते ती फोटो शेअर.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close