Uncategorized

कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते? शिवाय ते येऊ नये म्हणून काय उपाय कराल

आपण गृहिणी जेवणात नेहमीच कांदा वापरतो आणि कांदया शिवाय भाजीला चवही येत नाही. म्हणून कांदा डोळ्याला कितीही झोंबला किंवा अश्रुंच्या धारा वाहू लागल्या तरी जेवणात कांदा हा पाहिजेच. काही लोकांना कच्चा कांदा जेवणासोबत ही खायला आवडतो. तसेही कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे. पण तोंडाला वास येतो म्हणून काही लोक कच्चा कांदा खाणे टाळतात. कांद्यामध्ये दोन प्रकारचे तेल असते त्यातील एक तेल असते ते डोळ्यांना झोंबनारे शिवाय वास युक्त आणि आपल्या डोळ्यातून पाणी आणणारे रसायन अस्तित्वात असते. यात एसिड कांदा कापताना वातावरणात मिसळतात आणि त्याचा डोळ्यांशी आल्यावर डोळ्यातून अश्रूं येतात.

कांदा कापताना एका भांड्यात कांदे बुडतील इतके गरम पाणी घ्या आणि कांद्याचे दोन भाग करून त्या पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवा. याचबरोबर तुम्ही कांदा थंड पाण्यात ही ठेऊ शकता. त्यामुळे ही कांदे कापताना फरक जाणवतो. शिवाय कांद्याचे दोन भाग करून ते फ्रीज मध्ये ही ठेऊ शकता. त्यामुळे ही त्यातून निघणारा वास जाऊन डोळ्यातून पाणी ही येत नाही.

जेव्हा आपण कांदे कापण्याची प्रक्रिया करत असतो, त्याचवेळेस काहीतरी तोंडात ठेऊन ते कांदे कापून होईपर्यंत चघळत रहा. त्यामुळे कांद्याचा वास थेट आतमध्ये शिरणार नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा धुवून घेतल्यास त्यामध्ये असंनारी उग्र वासाची आणि डोळ्यांना झोबणारी संयुगे आणि एन्झाइम हे पाण्यामार्फत निघून जातात. त्यामुळे चिरताना डोळ्यात पाणी येत नाही.

कांदा कापताना त्याचा वरचा जाडसर साल नाही तर पापुद्रा काढा. आणि हा पापुद्रा कांदे कापताना तुमच्या डोक्यावर ठेवा.

शिवाय महत्वाचे म्हणजे कांदा कापताना फॅन चालू असेल तर तो पहिल्यांदा बंद करा. त्याच्या हवेमुळे डोळ्यांना थोडा जास्त त्रास होते हे लक्षात घ्या.

तसेच सध्या तुम्हाला कांदा कापताना डोळ्यातून पाणी नको यायला म्हणून एक गॉगल ही निघाले आहेते, ही वापरले तरी चालेल.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close