खेळबातमी

ह्या चार कंपन्यांचे मालक आहेत हे भारतीय खेळाडू

सध्या संपूर्ण जग लॉक डाऊन असल्याने सर्वच बंद आहे. अशात क्रिकेटसुद्धा बंद आहे. टी ट्वेण्टी मधील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग सुद्धा लांबणीवर गेलीय. आणि पुढे जाऊन ही लीग होईल असा अंदाज सुद्धा वर्तवला जात नाहीये. अशातच सर्व क्रिकेट बंद असल्याने हे क्रिकेटर घरात राहून काय करतात? हा प्रश्न सर्व सामान्यांना पडलाच असेल. पण काही असे खेळाडू सुद्धा आहेत ते फक्त क्रिकेट नाही तर आपली स्वतःची कंपनी सुद्धा चालवतात. आज आपण अशाच खेळाडूंची नावे आणि त्यांच्या कंपन्या पाहुयात.

विराट कोहली
विराट कोहली हे नाव क्रिकेट रसिकांसाठी खूप मोठं आहे. त्याच्या कंपनी चे नाव oneat आहे. बिमा कंपनी आणि विराट ह्यांच्या भागीदारीतून ही कंपनी तयार करण्यात आली आहे. लाईफस्टाईल आणि खेळ संबधित गोष्टी ह्या कंपनी मार्फत विकल्या जातात.

शिखर धवन
भारतीय क्रिकेट मधील सलामीचा फलंदाज शिखन धवनने पत्नी आयेशा सोबत DAONE ह्या कंपनीचा स्थापना केली. घरगुती गोष्टी आणि त्यांचे डिझाईन ह्या कंपनी मार्फत केले जाते. जेव्हा ही कंपनी सुरू करण्यात आली होती. तेव्हा जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी ह्या कंपनीचे प्रमोशन केलं होतं.

इरफान पठाण
भारतीय संघात गोलंदाजीत किमया केल्यानंतर इरफान ने आपला मोर्चा कॉमेट्रीकडे वळवला असला तरी त्याची स्वतः ची अशी कंपनी आहे. अकादमी ऑफ पठानस ह्या नावाने भाऊ युसुफ पठाण सोबत ह्या कंपनीचा निर्माण केला आहे.

महेंद्र सिंग धोनी
सध्या क्रिकेट पासून जरी महेंद्र सिंग धोनी लांब असला तरी त्याने आपल्या आयुष्यात खूप सारी संपत्ती कमावून ठेवली आहे. त्याने आपली सेवन ह्या कंपनीची स्थापना केली आहे. ह्या कंपनी मध्ये खेळ संदर्भातल्या अनेक गोष्टी विकत घेता येतात. अनेक शहरात त्यांचे मोठमोठे शोरुम सुद्धा बांधले गेले आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close