आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यादेशबातमीराजकिय
अमेरिकेने घेतला मोठा निर्णय; भारताची तुलना पाकिस्तान सोबत

अमेरिकन नागरिकांसाठी दक्षिण आशियामधील देशांपैकी भारत हा भटकंतीसाठीचा पहिला पर्याय असतो. परिणामी यामुळेच भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वाढत गेले आहेत.
मात्र आता असे जरी असे तरी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अचानकपणे भारताविरोधी भूमिका घेतली आहे. मात्र या भूमिकेमागील कारण अमेरिकेने अजूनही स्पष्ट केलेले नाही. भारतातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जाते.
एखाद्या देशात युद्धजन्य परिस्थिती, दहशतवाद आणि गुन्हेगारीने कळस गाठला असेल किंवा साथीचे रोग पसरले असतील तर त्या देशामध्ये आपल्या नागरिकांना न पाठवण्याचा निर्णय घेतला जातो.
अमेरिकेने तर अशा देशांची क्रमवारी बनवली आहे. त्यात अमेरिकेने प्रवासासंदर्भात भारताचे रँकिंग चार असल्याचे निश्चित केले आहे. हे सर्वात वाईट रँकिंग असल्याचे सांगितले जाते.
तसेच अमेरिकेने हे रँकिंग देत भारताचा समावेश युद्ध सुरु असणाऱ्या सीरिया, पाकिस्तान, ईराण, इराक आणि येमेनसारख्या देशांच्या यादीमध्ये केला आहे.