इतिहासकथाताज्या बातम्याबातमीब्लॉग

…म्हणून बहिर्जीना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणले जायचे

महाराष्ट्र म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की स्वराज्य, स्वज्यातले मावळे आठवू लागतात.

आज आपण याच स्वराज्यातल्या एका अशा मावळ्यांची गोष्ट पाहणार आहोत की जो, स्वराज्यात चाकरी करीत असूनही मोगलाईत, शत्रूच्या छावण्यांमध्ये जाऊन राहायचा. अगदी शत्रूच्या मांडीला-मांडी लावून शत्रूच्या तोंडून स्वराज विरोधी गोष्ट उकळून घ्यायचा.

हा मावळा म्हणजे स्वराज्याचा आणि शिवरायांचा जणू तिसरा डोळाच होता. अर्थातच हे स्वराज्याच रत्न म्हणजे साक्षात स्वराज्याचे गुप्तहेर खातेप्रमुख बहिर्जी नाईक.

हो! आज आपण याच इतिहासाच्या पानात हरवलेल्या बहिर्जी नाईकांची गोष्ट पाहणार आहोत.

बहिर्जी नाईक यांची लहानपनापासूनच खेळकर वृत्ती होती. मात्र तेवढेच ते बुद्दीनेही चतुर ही होते. पहिली गावात बलुतेदारी पद्धत असल्याने हे बहिर्जी प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला ही प्रत्येकाची कामे जमतात हा प्रयत्न करायचे तर कधी जंगलात जाऊन प्राण्या-पक्षांच्या आवाज काढण्यात दंग होऊन जायचे.

एके दिवशी जिजाऊंच्या आज्ञेनुसार हेच बहिर्जी जंगली जनावराचे शेपूट कापून जिजाऊंना दाखवायला स्वराज्यात आले, ते कायमचे स्वराज्याचेच होऊन गेले. एवढेच काय तर पुढे जाऊन मुंडासे बांधून जिवरी आणि वैशाखाच्या महिन्यात मोर ओरडत नाहीत याची जाणीव शिवरायांना करून देऊन बहिर्जीनी शिवरयांसोबत स्वराज्याच्या अग्निकुंडात उडी मारली ती कायमचीच.

मग काय! पुढे हेच बहिर्जी बालवयातल्या महाराजांच्या लुटूपुटूच्या लढाईपासून ते  एखाद्या किल्ल्याची माहीती हातोहात काढून आणन्याचे काम  करायचे. वेषांतर असे की महाराजांशिवाय दुसरे कोणीच ओळखू शकणार नाही.

अहो एवढेच काय तर, शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य हे बहिर्जीच्या हेरव्यवस्थेनेच चोखपणे बजावलेले आपल्याला दिसून येते.

पुढे ही जाऊन सांगायचे झाले तर गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने, बहिर्जी नाईक हे एक लढवय्ये देखील होते. ते तलवारबाजीत-दांडपट्यातही ते माहीर होते.

महाराजांनी एक मावळा एकाच मोहिमेसाठी वापरला अस आपण म्हणतो मात्र बहिर्जी नाईक या सर्वाला अपवादच आहेत. कारण अफजलखान महाराजांना भेटायला नाही तर जिवानिशी मारायला आलाय याची जाणीव करून देताना बहिर्जी नाईक आम्हाला अफजलखानाच्या वधावेळी भेटतात, पन्हाळ्यावरून महाराजांची सुटका करताना जसे आपल्याला बाजीप्रभू आणि शिवा काशीद दिसतात, त्याचप्रमाणे बहिर्जीच कार्यही आपल्याला याही मोहिमेत दिसून येतेच, मग शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूट असो अशा प्रत्येक प्रसंगात आपल्याला बहिर्जी नाईकांची कुठेना-कुठे माहिती देतानाची चोक भूमिका ही दिसतेच.

याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर, आग्र्‍याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग. मात्र या प्रसंगातही औरंगजेबासारख्या क्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत येणे. या मागील बुद्धीचातुर्य हे मुळात बहिर्जी नाईकांचेच. मात्र इथे बहिर्जी नाईकांची साथ मिळाली नसती तर आजचा इतिहास काही वेगळा झाला असता.

बैरागी ते भिकारी बणन्यात बहिर्जीचा कोणीच हात धरला नाही. बहिर्जी जसे सोंगे आणन्यात माहिर होते, तसेच ते अनेक भाषा बोलन्यात ही चतूर होते.

त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई.

कुठल्याही घटनेचा बहिर्जी खूप बारकाईने विचार करीत. शत्रूचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील ते माहिती ठेवत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुपतहेरा खात्यात जवळ जवळ तीन ते चार हजार गुप्तहेर होते.आणि ह्या सर्वांचे नेतृत्व बहिर्जी नाईक यांच्या कडे होते.

बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखातदेखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि शत्रूच्या छावणीतील माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेखही अस्सल कागदपत्रात आपणास आढळून येतात.

इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे.

शिवरायाच्या इती पासून अंतःपर्यत स्वराज्य हेच आपले ध्येय मानणारे बहिर्जी शेवटी शिवरायांच्या निधनानंतर कोलमडले.

आयुष्य भर महादेवाचा जसा नंदी तसा शिवरायांना नंदी बनुन साथ देनारा हा वाटाड्या शेवटी भुपाळगडावर लढताना जखमी झाला. आणि भुपाळगडच्या पायथ्याशी येऊन श्री शंकराच्या मंदिरात या शिवबांच्या नंदींनं आपला प्राण सोडला.

स्वराज्यासाठी आयुष्यभर झटत राहणारा हा स्वराज्याचा रत्न मात्र इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवलेला आज आपल्याला पाहायला मिळतो यापेक्षा मोठं दुर्दैव काय असावे.

-निवास उद्धव गायकवाड

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close