Uncategorized

या दिवसात स्त्रियांना नेलपॉलिश काढण्यासाठी रिमोवर नसेल तर हे घरगुती उपाय करा

नेलपॉलिश ही खरतर तुमच्या स्त्रीच्या सौंदर्यात भर घालत असते. ती लावल्यामुळे तुमच्या हाताचे सौदर्य अधिक खुलून दिसते, पण हीच नेलपॉलिश नखांवरून जात आली असेल तर अर्धी रंगलेली नखे आपल्या हाताची सुंदरता घालवतात. शिवाय सध्याच्या काळात नेल रिमुवर बाहेर जाऊन आणणे कठीण गोष्ट बनली आहे. त्यासाठी आपण बाहेर जाऊन ते आणु शकत नाही. म्हणून आज आपण हीच नेलपॉलिश काढण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे तुमची नेलपॉलिशही निघून जाईल आणि ते ही घरगुती उपायांनी.

व्हिनेगर
आपल्या घरात व्हिनेगर आताच्या काळात तरी सर्वांच्या घरात असतोच. काही लोक चायनीजमध्ये वापरतात तर काही लादी किंवा अनेक प्रकारच्या वस्तू साफ करण्यासाठी व्हिनेगर वापरतात. हा व्हिनेगर कापसामध्ये घ्या आणि तो नेलपेंट काढायच्या ठिकाणी फिरवा.

टूथपेस्ट
टूथपेस्ट ही सर्वाच्या घरात उपलब्ध असते आणि नेलपेंट काढण्यासाठी हीचा वापर ही तुम्ही करू शकता. त्यासाठी बोटांच्या नखावर टूथपेस्ट लावा आणि कापसाने ही नखे हळू हळू साफ करा म्हणजे नेलपेंट निघून जाईल.

नेलपेंट
नेलपेंट ने नेलपेंट साफ करता येते हा विचार तुम्ही याअगोदर केलाच नसेल पण नेलपेंट वर नेलपेंट थेंब टाका आणि लगेच पुसून काढा. त्यामुळे नेलपेंट लगेच निघून जाईल.

अल्कोहोल
तुमच्या घरात अल्कोहोल असेल तर तो कापसत घेऊन नख पुसल्याने नेलपॉलिश लगेच निघून जायला मदत होते. शिवाय बियर ही वापरून बघा त्यात अल्कोहोल असतो. नाहीतर सध्या तुमच्या घरात सेनेटाइजर असेलच त्याची अल्कोहोल असते ते वापरून बघा.

गरम पाणी
घरात काहीच नसेल तर पाणी तर असतेच तेच पाणी गरम करा आणि एका वाटीत घ्या. त्या वाटीत बोट जवळ जवळ दहा मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर कापसाने ही नेलपेंट साफ करा.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close