बातमी

EPFO धारकांना फ्री मध्ये मिळतो ६ लाखाचा विमा, जाणून घ्या तुम्ही पण कसे प्राप्त कराल

प्रत्येक कामगारांना EPFO नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या सुख सुविधा देत असतो. पण सर्वच सुविधा तुमच्या पर्यंत पोहोचतात असे नाही. काही सुविधा अशाही असतात ज्या आपल्यासाठी चांगल्या असतात पण आपल्याला माहिती देखील नसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका EPFO
च्या सूविधेबद्दल सांगणार आहोत. तुमच्या अडचणीच्या दिवसात ही रक्कम तुमचे कुटुंबीय वापरू शकतात.

सर्व EPFO धारकांना इन्शुरन्स स्कीम १९७६ इंप्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस (EDLI) च्या अंतर्गत एक विमा कवर मिळतो. आणि ही रक्कम छोटी नसून सहा लाख एवढी असते. ह्या सुविधेचा फायदा तुम्ही केव्हाही आणि कसेही घेऊ शकत नाही. फक्त गंभीर गोष्टी म्हणजेच अपघात, अचानक मृत्यू, गंभीर आजारपण अशा गोष्टी मध्येच तुम्हाला ह्या विम्याची प्राप्ती होईल.

ह्या सुविधेचा फायदा त्याच लोकांना मिळतो ज्यांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूच्या अगोदर १२ महिन्याच्या आत एक किंवा अधिक कंपनी मध्ये काम केलेले असेल. त्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम प्राप्त होते. ह्या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी रक्कम आपल्याला भरावी लागत नाही. आपल्या EPFO मार्फतच आपल्याला ते प्राप्त होते.

कामगारांचे महिन्याला एक विशिष्ट रक्कम कापली जाते. बेसिक पगार आणि डिए च्या १२% ही रक्कम कापण्यात येते. ज्यात ८.३३ टक्के रक्कम पेंशनमध्ये जाते तर बाकी रक्कम ईपीएफ मध्ये जमा होते. आपल्याला मिळणार विमा ह्याच रकमेतून आपल्याला प्राप्त होतो.

तुमच्या मनात आले असेल की ही रक्कम तुम्हाला कशी मिळेल? पण ह्या रकमेचा चेहरा तुम्हाला पाहता येणार नाही कारण तुमचा मृत्यू झाला तर तुमचे कुटुंबीय ह्या विम्यासाठी अर्ज करू शकतात. जी व्यक्ती अर्ज करेल ती कुटुंबातीलच असावी. आणि तिचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असावे. अर्जासोबत ईपीएफ धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट, माइनर नॉमिनी कडून अर्जदाराचे बँक अकाऊंटची माहिती, गार्जियनशिप सर्टिफिकेट जमा करावे लागते.

ह्या सर्व डॉक्युमेंट वर सत्यप्रत केलेली गरजेची आहे. तरच तुमचा अर्ज पडताळून मान्य केला जाईल. ह्या विम्यात अनेक अटी सुद्धा आहेत. त्या तुम्हाला मिळालेल्या फॉर्मवर वाचायला मिळतील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close