विचार

वास्तुशास्त्र : चुकूनही ह्या गोष्टींची अदलाबदली करू नका, भोगावे लागतील हे नुकसान

आपण दैनंदिन जीवनात सर्वात जास्त कोणत्या गोष्टी वापरतो असा कुणी प्रश्न केला तर ९९% लोकांचे एकच उत्तर असेल ते म्हणजे गैजेट्स. चालू जगात सध्या लोक सर्वात जास्त गैजेट्सचा वापर करत आहेत. तुम्ही नजर वर करून कुठेही पाहिले तर अनेक गैजेट्स तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतील. ह्या विज्ञानाच्या युगात गैजेट्समुळे लोकांची कामे लवकर होऊ लागली आहेत. अत्यंत कमी वेळात मोठं मोठी कामे क्षणार्धात पूर्ण होतात.

गैजेट्समुळे अनेक छोटी मोठी कामे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वेळात पूर्ण होऊन जातात. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का की हेच गैजेट्स तुमच्या भविष्याशी जोडले गेले असतात. ज्या गैजेट्सचा उपयोग तुम्ही अनेक वर्ष करत आहात अशा गैजेट्समध्ये तुमची नकारात्मक ऊर्जा सामावली जाते. म्हणूनच वास्तुशास्त्राप्रमाणे अशा गोष्टींची देवाण घेवाण करू नये.

चष्मा घेऊ नका आणि कुणाला देऊ नका
दुसऱ्या कुणी वापरलेला चष्मा आपण वापरात नाही घेतला पाहिजे तर आपण वापरलेला चष्मा दुसऱ्या कुणाला वापरण्यासाठी देऊ नये. असे केल्याने ज्याचा चष्मा असेल त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभवती फिरू लागते.

हाताचे घड्याळ एकमेकात बदलू नका
घड्याळ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते कारण घड्याळ अशी एक वस्तू आहे जी माणसाशी नेहमी जोडलेली असते. आपले घड्याळ जुने झाले किंवा नवीन घड्याळ घेतले की जुने घड्याळ कुणाला तरी देण्याची इच्छा होते. पण असे चुकूनही करू नका. असे केल्याने शास्त्रानुसार तुमच्या भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते.

मोबाईल कुणालाच देऊ नका
मोबाईल जुना होताच किंवा मार्केट मध्ये नवीन फोन येताच आपण आपल्या जुन्या फोनला बाय बाय करून नवीन फोन विकत घेतो. मग अशात जुना फोन कुणाला तरी देऊन टाकतो किंवा मग विकून टाकतो. पण असे करू नये कारण मोबाईल अशी गोष्ट आहे जी आपण सर्वात जास्त वापरात असतो. आपल्या अनेक भावना त्यासोबत जोडल्या गेल्या असतात. अशात जर आपण इतर कुणाचे फोन वापरू लागले तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पुढे जाऊन मानसिक त्रास सहन करावा लागतो.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close