मनोरंजन

Netflix वरील ह्या हिंदी सिनेमात हिरो हिरोईन पेक्षा मराठमोळी अमृता सुभाष भाव खाऊन गेलीय

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात निर्मात्यांचा कळ दिसून येतोय. लॉक डाऊन मुळे सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होऊ शकत नाहीत म्हणून असे सिनेमे ऑनलाईन प्रदर्शित केले जातात. अशातच Netflix वर Choked पैसा बोलता है हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. सध्या हा सिनेमा खूप लोकांना आवडत आहे. कारण ह्या सिनेमाचा विषय Demonetization चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी Demonetization अचानक मध्यरात्री लागू केल्यानंतर झालेली धावपळ ह्या सिनेमात पाहता येईल. नेहमीच मारधाड सिनेमे करणारा दिग्दर्शक अनुराग कश्यपने ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. एकही बोल्ड सीन आणि शिव्या नसलेला हा सिनेमा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून हा सिनेमा पाहू शकता. सिनेमात तुम्हाला मुख्य भूमिकेत सयामी खैर रोशन म्याथ्यू तुम्हाला पाहायला मिळतील.

अचानक रात्री घराच्या किचन मधील पाइप मधून पैस्याचे बंडल अभिनेत्रीला सापडतात. त्यानंतर पुढे रंगतदार चालणारा हा खेळ पाहायला मज्जा येते. पण मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेता आणि अभिनेत्री पेक्षा सहाय्यक अभिनेत्री असलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष खरंच भाव खाऊन गेली आहे. तीने ह्या सिनेमात शार्वरी ताई हीची भूमिका केली आहे.

तिला स्क्रीनवर पाहताना तुम्ही अचंबित व्हाल. Sacred Game वेब सिरीज मध्ये काम केल्यानंतर पुन्हा एकदा ती रसिकांचे मन जिंकताना तुम्हाला पाहायला मिळेल. काही सीन तिने ह्या सिनेमात असे दिले आहेत की तिचा अभिनय करताना नावाजुद्दकिन सिद्दकीला आपण समोर पाहतो असा भास होतो. हा सिनेमा अमृता साठी तुम्ही नक्कीच पाहा.

अमृता नंतर सयामी ने सुद्धा उत्तम अभिनय केला आहे. माऊली सिनेमानंतर पुन्हा एकदा तिने मराठी मुलीची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात अनेक मराठी कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. ह्यात राजेश्री देशपांडे, उपेंद्र लिमये, मिलिंद पाठक, तुषार दळवी, उदय नेने अशी स्टार कास्ट तुम्हाला पाहायला मिळेल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close