Uncategorized

तुमच्या सुंदर दिसणाऱ्या चेहऱ्यावर मुरम्यांमुळे खड्डे पडले आहेत का करा हे उपाय

आता प्रदूषण इतके वाढले आहे की त्यामुळे होते तुमच्या चेहऱ्यावर मुरम्या येणे साहजिक आहे. शिवाय काही लोकांची त्वचा इतकी तेलकट असते की त्यांना चेहरा सतत धुण्याची गरज असते. पण तसे काही होत नाही. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मुरूम येण्याची शक्यता जास्त असते. तर काही व्यक्तींच्या तर तरुणाईमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्मोनल बदलांमुळे मुरूम येण्याची समस्या सुरु होते. ती लवकर संपताच नाही आणि हे मुरूम आल्यानंतर काही लोक त्या जागी खरवडत असतात तर काही ती हातानी फोडतात. त्यामुळे त्या जागी खड्डे पडतात. हे खड्डे आपण घरगुती उपायांनी कसे कमी करू शकतो हे आज पाहूया.

पहिल्यांदा बेसन घ्या त्यात एक लिंबू मिसळा आणि थोडे दूध ही मिसळा. ही मिश्रण खड्डे असणाऱ्या चेहऱ्यावर लावत जा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे कमी होण्यास मदत होईल.

मुलतानी माती आणि लिंबाचा रस त्यात थोडे गुलाब पाणी घेऊन हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे कमी होण्यास मदत होईल. तसेच मुलतानी माती आणि लिंबाचा रस यामुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

कोरफड ही आपल्या त्वचेवर औषध सारखे काम करते. यासाठी कोरफडीचा गर घ्या आणि त्यात व्हिटॅमिन ई ची गोळी मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा त्यामुळे ही तुमच्या चेहऱ्यावरील खड्डे कमी होण्यास मदत होईल.

आता महत्वाचं म्हणजे घरगुती वस्तूंपासून आपल्याला फरक पडतो पण त्यासाठी थोडा वेळ द्यायची गरज आहे. हे उपाय एकदा नाही तर रोज करण्याची गरज आहे. त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर याचा उत्तम परिणाम दिसून येईल.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close