बातमीमनोरंजन

शाहरूख खानची मुलगी आणि असिम रियाज एकत्र सिनेमातून झळकणार

सध्या तरी बॉलिवुडमध्ये स्टार किड्सची एन्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातील बरेच स्टार आपल्याला चित्रपट मध्ये पाहायला ही मिळाले आहे पण अजूनही शाहरुख खान या अभिनेत्याची मुलगी आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान येत आहे एका नवीन चित्रपटात आणि ही गोष्ट खरी आहे एका प्रोड्युसर ने तसा खुलासा ही केला आहे. पण आता प्रेक्षकांना याचीही उत्कंठा लागली असेल की या अभिनेत्री सोबत कोणता हिरो आपल्याला पाहायला मिळणार आहे.

असिम रियाज तुम्हाला बिग बॉस १३ मधील जरी विजेता ठरला नसला तरी प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा कायम विजेता म्हणून राहणार आहे. असा हा बिग बॉस १३ मधील एक स्पर्धक त्याचे नाव आहे असीम रियाज सुहाना खान हिच्यासोबत नवीन चित्रपटामध्ये दिसणार आहे. या दोघांना घेऊन करण जोहर हा सिनेमा काढणार आहेत. तसे त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरती ट्विट केले आहे.

करण जोहर याने ट्विट केल्यानुसार सुहाना खान आणि असीम रियाज या दोघांना घेऊन तो सिनेमा करन जोहर प्रोडूस करणार आहे. त्याचा सिनेमा असणार आहे स्टुडंट ऑफ द इयर ४ साठी दोघांनाही साईन करणार आहे. अशी खात्रीलायक माहिती सूत्रानुसार मिळाली आहे. अजूनही या फिल्म बाबत जास्त काही माहिती मिळाली नाही आणि सुहाना आणि असीम या दोघांनीही याबाबत माहिती दिलेली नाही. पण या दोघांच्या चाहत्यांनी हा विषय सोशल मीडियावर उंचावला आहे.

आसिम रियाज बद्दल बोलायचं तर बिग बॉस १३ ने या आपल्यासारख्या असणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला खूप मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. आणि त्याचबरोबर मोठमोठ्या कलाकारांनी ही त्याला सपोर्ट केला आहे इतकंच नाही तर WWE रेसलर जॉन सीना सुद्धा त्याचा चाहता झाला. त्यानं दोन वेळा आसिमचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. असिम ने शून्यातून विश्व निर्माण करून एवढं भलं मोठं यश त्याने पदरात पाडून घेतलं आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close