मनोरंजन

ज्यांना अशी ही बनवाबनवी हा सिनेमा खूप जास्त आवडतो त्यांनी वाचा

‘अशी ही बनवाबनवी’ हा मराठी चित्रपट अजूनही किती तरी वेळा तरी टीव्ही वर येऊन गेला असेल पण तो दरवेळी बघावासा वाटत असतो. या सिनेमासारखे कडक डायलॉग्ज आणि अप्रतिम टाईमिंग परत कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाले नाहीत. त्यातील कलाकारांची कॉमेडी विशेष म्हणजे अशोक सराफ आणि लक्षा हे कॉमेडीचे पात्र म्हणजे यांना चेहरा बघूनच कधी कधी हसायला इतके कॉमेडी यांच्यात भरलेली आहे. अशोक सराफ यांची या चित्रपटात त्यांच्या भावाच्या म्हणजे शंतनुच्या शिक्षणासाठी चाललेली झटपट आपल्याला दिसून येते.

सध्या लक्षा आपल्यात नाही पण त्याचे चित्रपट आपण अजूनही नेहमी पाहतो आणि खरोखर तो यावेळी ही आपल्यातच आहे असेच भास होतो. त्याची साडी मधील पार्वती त्यावेळी लोकांना भावून गेली होती. नववारी साडीमध्ये असणारी ही पार्वती अजूनही चित्रपट पाहताना हसू येते ते म्हणजे तिच्या डोहाळे जेवणाच्या वेळी तिने केलेला नाच खूप हास्यास्पद होता. याच्या सोबत सचिन पिळगावकर यांची भूमिका ही खूप छान म्हणजे त्यांनी जी स्त्री वेशातील भूमिका केली होती. ती खरोखर वाखडण्याजोगी आहे. सचिन हे स्त्री वेशात ही खूप सुंदर दिसत होते. त्यांची साडी केसांची हेअर स्टाईल, चेहऱ्यावरील मेकअप, सगळं काही बघण्यासारखं आहे.

या चित्रपटाला सध्या तरी जवळ जवळ ३१ वर्षे पूर्ण झाले आहेत पण हा चित्रपट बघताना हे ही विसरून जातो की याला इतके वर्ष झाले असतील. २३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने तब्बल ३ कोटींचा नफा मिळवला होता. आताच्या काळात ही रक्कम कमी आहे पण त्यावेळी ती खूप होती. हा चित्रपट पाहताना फुल हास्यास्पद आहे पण या विनोदात कुठेही अश्लीलता दिसून येत नाही आणि ही खरी कॉमेडी प्रेक्षकांना आवडली. कितीही वेळा पहायची वेळ आली तरी पेक्षक अजिबात कंटाळला नाही या चित्रपटाला.

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर, लक्षा, सिद्धार्थ राय, सुप्रिया पिळगावकर, अश्विनी भावे, प्रिया अरुण आणि निवेदिता जोशी या सगळ्याच कलाकारांनी या चित्रपट मध्ये मोलाची भूमिका केली आहे. सगळ्यांच्याच भूमिका यात खास होत्या. या चित्रपट मध्ये ४ तरुणांची घरासाठीची धडपड मनाला चटका लाऊन जाते. शिवाय त्यांचे घरमालक सरपोतदारांसारखें यांच्यासारखे घरमालक आपल्याला खऱ्या आयुष्यात ही पाहायला मिळतात.

तुम्ही सुद्धा हा सिनेमा बऱ्याच वेळा पहिला असेलच. कितीवेळा पाहिला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Tags

Related Articles

2 Comments

  1. Aaj as vathki ha cinema daroj Pahsvasa vathto.tyat mala aavadnar dialog “Mhanje Dhanajay mane ithech rahatat ka”.ani dusra dilog mahnaje “Diabetes cha Aushda Sathi 50 rupye nhi 70 rupye lagtil”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close