कथा

असच होतं मग त्याने लग्न तरी का केलं माझ्याशी?

अहो चहा घ्या हा बघा इथे ठेवला आहे, घ्या लवकर नाहीतर थंड होईल. याचं काय असते सदा न कदा त्या मोबाईल मध्ये कुणास ठाऊक बाई, मला तर अजुन एकदा ही त्या मोबाईल ला हात लावायला जमलं नाही आणि लावायची ही भीती वाटते. आमच्या लग्नाला जवळ जवळ एक महिना झाला असेल पण पाहिजे तसे मी यांना ओळखलेच नाही अजुन. माझ्या घरात सासू, सासरे आणि आम्ही दोघे इतकीच माणसे पण तरीही घरात कोणीच नाही असे वाटते. सासरे नेहमीच बेड वर पडलेले असतात. कारण त्यांना लखवा मारलाय.

त्यांचं सगळं माझ्या सासू बाई करतात आणि म्हणून सासू बाईंचा दिवस सासऱ्यांच सगळं करण्यात जातो आणि म्हणून घरात इतके जन असूनही मी एकटीच असल्या सारखे वाटते. मागच्याच आठवड्यात हे अंघोळीला गेले होते तर त्यांचा मोबाईल वाजायला लागला म्हणून मी थोड वाकून पाहिले इतक्यात ते बाथरूम काय बाहेर आले. पहिल्यांदा माझ्याकडे डाफरुन पाहिले आणि लगेच मोबाईल घेऊन बाहेर गेले. मला जे काय समजायचे होते ते समजले आणि जाऊन कपडे धुवायला बसले. अगदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत माझा नवरा माझ्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलला नाही, का ते मलाही माहित नाही पण राहून राहून मला त्यांच्यावर एक प्रकारचा संशय येतो आहे तो म्हणजे यांचं लग्नाअगोदर कोणा मुलीसोबत लफड तर नसेल ना?

हा प्रश्न मला रोज पडतो आणि त्या प्रश्नाने अनेकदा माझे डोके भंडावून जाते. पण तरीही मला हा संसार करणे भाग आहे. कारण माझे म्हणणारे माझ्या घरी कोणीच नाही. एक सावत्र आई आहे. तिने लहानपणापासून माझा फक्त तिरस्कार केला हे मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून त्या रोजच्या छळापेक्षा हे जीवन काहीच वाईट नाही असे मला तरी वाटते. नवरा माझ्याकडे धड बघत ही नाही पण तरीही माझ्याबद्दल तिरस्कार ही त्याच्या मनात नाही. तो तसा खूप चांगला आहे असे कधी कधी वाटायला ही लागले आहे.

एकदा मी वरच्या जिन्यावरून खाली पडले तेव्हा त्यांनीच मला उचलून डॉक्टर कडे नेले होते. अशा खूप आठवणी आहेत. एका महिन्यातील त्याच्यामुळे ते माझा तिरस्कार तर मुळीच करत नाहीत पण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि हेच कारण आहे ज्यामुळे मला चैन पडत नाही. एक त्यांचा मित्र तो नेहमी घरी येतो. घरी येतो म्हणजे तो मित्र आणि आमचे हे दोघेही जिवलग मित्र कुठेही जाताना दोघेही सोबत जायचे. कधी कधी मला वाटायचे की मी त्यांच्या मित्रा जवळ माझे मन मोकळे करावे. माझ्या मनातील भीती त्यांना बोलून दाखवावी पण भीती वाटत होती कारण नवऱ्याचा मित्र होता आणि त्याला हे बोलल्यावर तो पटकन जाऊन त्यांच्याजवळ बोलायचं त्यापेक्षा नकोच, म्हणून सगळं दुःख एकटीच आतल्या आत पचवून झुरत होते.

आता जवळ जवळ आमच्या लग्नाला सहा महिने झाले असतील पण अजूनही माझ्या नवऱ्याच वागणं बदललं नव्हतं. आणि म्हणून माझ्याही मनाची घालमेल कमी होत नव्हती. पण मी माझ्या मनातलं बोलणार तरी कोणाकडे कोणीच तिथे माझं अस नव्हतं. माझ्यासाठी माहेर ही परक झाल होत आणि आता तर सासरही, एक दिवस त्यांचा तो नेहमीच मित्र आमच्या घरी आला, मी चहा ठेवायला म्हणून स्वयंपाक घरात गेले आणि चहा घेऊन आले आमचे हे आणि मित्र दोघेही बेडरूम मध्ये बसले होते. मला वाटलं काहीतरी नक्कीच यांच्या बाहेरच्या लफड्याबद्दल बोलत असतील पण दरवाज्याला कान लावले आणि वेगळेच आवाज कानावर यायला लागले. म्हणजे जसे नवरा बायकोचे संबंध असतात तसेच काहीतरी आवाज आतून येत होते.

मला काहीच कळत नव्हते म्हणजे या दोघांचं नक्की चाललय तरी काय? म्हणून मी आमच्या दाराच्या कोपऱ्यातून एक फट आहे तिथून पाहायला लागले आणि माझी बोबडीच वळली, पुढे काय बोलावं तेच मला कळत नव्हते, कारण त्यांचा तो मित्र आणि आमचे हे एकच बेड वर? मला तर सांगायला ही लाज वाटते आहे कारण आज मला समजले माझा नवरा गे आहे, तसे होते तर त्यांनी माझ्याही लग्न नव्हते करायला पाहिजे का माझ्या आयुष्याचे तीन तेरा वाजवले? आता मात्र मी ह्या पेचात अडकले आहे. माहेरी जाऊ शकत नाही आणि सासरी हे असे चालू आहे.

लेखक : पाटीलजी

Tags

Related Articles

5 Comments

  1. मग आत्ता तू काय करायचं ठरवलंय…..?
    Mobile :- 9404996645

  2. एखादा चांगला मुलगा बघायचा किंवा कोणी तुझ्यावर प्रेम करत असेल तर त्याला सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न कर. तो जर तुझ्यावर प्रेम करतो आणि लग्न करायला तयार असेल तर काय हरकत आहे. पुन्हा एकदा नविन जिवनाची सुरुवात कर. माझ्या कडून तुला शुभेच्छा. खचून न जाता नव्याने जग निर्माण करण्याची जिद्द असली पाहिजे. Good luck

  3. दुसरे लग्न करावे आपण नवीन जीवनाची सुरुवात करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Close