
तुम्ही आजवर जेवढे प्रेम मला पाटीलजी म्हणून दिलं आहे त्यासाठी मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे. असेच प्रेम नेहमी सोबत असेल ह्याची मला खात्री आहे. मी नेहमी म्हणत असतो पाटीलजी हे फक्त एक पेज नसून ते माझं ऑनलाईन कुटुंब आहे. तुम्ही सर्व मित्र मैत्रिणींनी नेहमी माझ्या पोस्टला योग्य तो प्रतिसाद दिलात. मग ती पोस्ट प्रेमाची असो किंवा लिहलेली कथा असो. तुम्ही नेहमीच मला साथ दिली आहे.
तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी आजवर ५०७ कथाचे लेखन केलं आहे. ह्यात प्रेमकथांचा समावेश जास्त प्रमाणात आहे. प्रेमकथा लिहताना एक वेगळाच आनंद मिळतो. त्यांच्यातले अनेक लोक मला मेसेज करून सांगतात की पाटीलजी तुम्ही तुमच्या कथा ह्या ह्या ऍपमध्ये का टाकत नाही. आम्हाला तुमच्या कथा अँपमध्ये वाचायच्या आहेत. अशा सर्वांना माझे एकच सांगणे आहे. मित्रानो जर माझे स्वतःचे अँप असून मी दुसऱ्यांच्या अँप मध्ये कथा टाकून त्यांना कंटेंट का देऊ.
जे लोक मला खूप आधीपासून ओळखतात त्यांच्याकडे आपले अँप असेल. आपले अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे आणि ते सुद्धा अगदी मोफत. तिथे मी आजवर लीहलेल्या सर्व कथा अपलोड केल्या आहेत. तुम्ही आताच जाऊन Patiljee Marathi Katha असे सर्च केले तर लगेच आपले अँप समोर येईल. एवढेच काय तर तुम्ही फक्त मराठी कथा असे सर्च केलं तरी आपले अँप समोर दिसेल.
ह्यामध्ये तुम्हाला प्रेमाच्या, विरहाच्या, मैत्रीच्या, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक कथा वाचायला मिळतील. मी वाट कसली पाहत आहात. लॉक डाऊन मध्ये वेळ काढण्यासाठी आपल्या अँपचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. कोणतीच कथा तुम्हाला बोर करणार नाही. प्रत्येक कथा वाचून तुम्ही त्या पात्राच्या प्रेमात पडाल.
जसे प्रेम तुम्ही इथे पाटीलजी ह्यांना दिलं आहे तसेच प्रेम तिकडे पण द्याल अशी आशा आहे. आणि आपल्या कथा तुम्ही नित्य नियमाने वाचत असाल तर कशा वाटतात कथा नक्की आम्हाला सांगा.
तुमचा पाटीलजी