बातमी

१४ मे पासून मिळणार घरपोच दारू

मद्य प्रेमींना दिलासा देणारी बातमी आज सरकार कडून जाहीर करण्यात आली आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मद्य विक्रीला शासनाने बंदी घातली होती. काही दिवसापूर्वी ह्या विक्रीला सुरुवात केली होती. पण इथेही लोकांची अती प्रमाणात गर्दी होत असल्याने ही विक्री थांबवण्यात आली. पण आज सरकारे दिलासा देणारी बातमी दिली आहे. १४ मे पासून मद्य प्रेमींना घरपोच दारू मिळणार आहे. त्यांनी फक्त नजीकच्या दुकानात फोन करून आपली ऑर्डर बुक करावी लागेल.

पण ह्या गोष्टीसाठी अनेक नियम असणार आहेत. ज्याठिकाणी दुकाने चालू आहेत अशाच ठिकाणी दारू विक्रीला परवानगी दिली आहे. रेड झोनमध्ये हा नियम लागू नसणार आहे. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय अर्थव्यवस्थेला ह्यातून हातभार लागावा हा ह्या मागचा हेतू असणार आहे.

जो व्यक्ती मद्य घेऊन तुमच्याकडे येईल त्यासाठी सुद्धा काही नियम लावण्यात आले आहेत. त्याकडे सरकार करून दिलेला परवाना म्हणजेच आयडी असेल. त्याच्याकडे Sanitiser असावे. प्रत्येक वेळी त्याने त्याचा वापर करावा. जी माणसे मद्य घेऊन जातील त्याची नेमणूक शॉप मालकाने करावी. अजुन तरी कोणत्याही ऑनलाईन सर्व्हिस पार्टनरना सोबत घेण्याचे आदेश दिले नाहीत. काहीच दिवसापूर्वी Zomato ने आम्ही दारू लोकांपर्यत पोहोचवू असा प्रस्ताव मांडला होता.

जो दुकानदार ही मद्य विकणार आहे त्याच्याकडे ह्याची परवानगी असणे बंधनकारक असणार आहे. त्या मालकाकडे दारू विक्रीचा परवाना असला पाहिजे. जर त्यांच्याकडे हा परवाना नसेल तर ऑनलाईन तुम्ही परवाना साठी नोंदणी करू शकता अशी माहिती राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभुराज देसाई ह्यांनी दिली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close